पुणे: पुण्यातील खडकवासला येथील डॉ. रणजित निकम आणि त्यांचे सहकारी डॉ. राजपुरोहित यांनी काल रात्री पुण्याच्या एका विलागीकरण केंद्रात काम करत असताना, त्यांना एका पेशंट ची तब्बेत अचानक खालावल्याने , पेशंट ला ICU असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करावं लागणार होतं, 108 च्या अँबुलन्स ची सोय होत नव्हती, विलागीकरण केंद्रातील अँबुलन्स च्या ड्रायवर ची तब्बेत खराब होती, व बदली ड्रायवर चा फोन लागत नव्हता, पेशंट चे नातेवाईक सुद्धा त्याच केंद्रात उपचार घेत होते, त्यामुळे त्यांच्याकडून ही काही सोय होत नव्हती.
शेवटी वेळचे महत्व ओळखून डॉ रणजित निकम आणि डॉ राजपुरोहित यांनी स्वतः अँबुलन्स न्यायचे ठरवले.
डॉ रणजित निकम यांनी स्वतः अँबुलन्स चालवत , पेशंट ला दीनानाथ हॉस्पिटल तिथून सह्याद्री हॉस्पिटल येथे नेले, पण बेड उपलब्ध नसल्याने शेवटी त्यांना पुना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
विलंब न करता , वेळेवर दाखल केल्याने, रुग्णाला वेळेवर उपचार सुरू झाले.
#Pune #Doctor #Corona #Khadakwasla #RanjeetNikam #Ambulance #Sakal #SakalMedia

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.